आमच्या विषयी

कृषी उत्पन्न बाजारसमिती, शेगांव

कृषी उत्पन्न बाजार समिती, शेगाव ची स्थापना दिनांक 01/04/1898 रोजी झाली आहे. शेगाव बाजार समिती अ वर्ग गटात येत आहे.

बाजार समितीची वैशिष्टये
1) खुल्या लिलावाने शेतीमालाची विक्री.
2) स्पर्धात्मक बोली जास्तीत जास्त बाजार भाव.
3) बाजार समितीचे अनुज्ञप्तीधारक मापा-याकडुन इलेक्ट्रॉनिक वजनकाटयाव्दारे अचुक मोजमाप.
4) सर्व सुखसोयीयुक्त बाजार आवार.
5) म.रा.कृ.प.मंडळ, पुणे अंतर्गत शेतकऱ्यांकरीता 6% व्याजदराने शेतमाल तारण कर्ज योजना.
6) शेतमालाच्या व्यवहाराच्या तक्रारीची त्वरीत दखल.
7) शेतक-यांचे माहितीसाठी इंटरनेटव्दारे SMS बाजार भाव शेतक-यांना मोबाईलवर पाठविण्याची सुविधा.
8) विदयुत व्यवस्थेसाठी जनरेटरची व्यवस्था व स्त्री व पुरूष शेतकऱ्यांकरीता स्वतंत्र सुलभ स्वच्छता गृह.
9) अडते, व्यापारी व शेतकऱ्याकरीता बाजार आवारात 50 टनी वे-ब्रिज काटा.
10) बाजार आवारामध्ये शेतकऱ्याचे शेतमालाचे संरक्षणा करीता सि.सि. टिव्ही कॅमेरे.
11) बाजार भाव प्रदर्शित करण्याकरीता बाजार आवारात एल.ई. डी. डिस्प्ले व टिकर बोर्ड.
12) शेतकरी, व्यापारी यांचे करीता पणन मंडळाचे कृषि पणन मित्र मासिकाची बाजार समिती अंतर्गत सभासद नोंदणी सुविधा.
13) बाजार समितीचा केंद्र शासनाचे ई-नाम योजनेमध्ये समावेश.
14) सेंट्रल रेल्वे स्टेशन अंतर 1 कि.मी.

....